Christmas & New Year Celebration: महाराष्ट्रात कोविड19 आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पावले उचलत आहे. परंतु आज राज्य सरकारकडून ख्रिसम, नवं वर्ष आणि लग्न समारंभ, हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये होणारी गर्दी पाहता नव्या गाइडलाइन्स जाहीर करण्याची शक्यता आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड19 आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता रात्री 10 वाजता कोविड19 टास्क फोर्स सोबत व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून बैठक बोलावली होती. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सातत्याने वाढत असलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांवर लगाम घालण्यासंबंधित मुद्द्यांवर चर्चा केली.
गुरुवारी राज्यात एकाच दिवसात ओमिक्रॉनचे सर्वाधिक 23 रुग्ण आढळले. राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा आता 88 वर पोहचला आहे, बुधवारी कोणताही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला नाही. परंतु गुरुवारी कोरोनाचे आणखी 1179 रुग्ण आढळले असून त्यामधील 23 रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. या व्यतिरिक्त 17 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली गेली आहे.(Christmas 2021 Guidelines: चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच परवानगी; राज्य सरकरने जारी केल्या नाताळ साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना)
Tweet:
Maharashtra Govt to issue a detailed guideline on Friday to avoid crowding in wedding ceremonies, hotels and restaurants during Christmas and New Year https://t.co/FMK5G01fFB
— ANI (@ANI) December 23, 2021
दरम्यान, ख्रिसमस आणि नवं वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतात. परंतु सध्याची परिस्थिती पाहता संक्रमण अधिक वेगाने पसरत आहे. याच कारणास्तव सरकारकडून नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या जाणार आहे. परंतु मुंबईत येत्या 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे.