मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या शपथविधी वेळी शिवेसना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस ( Nationalist Congress Party) आणि काँग्रेस (Congress) अशा प्रत्येकी दोन आमदारांनी म्हणजेच मिळून सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Uddhav Thackeray Cabinet Extension) बातम्या आणि उत्सुकता दोन्ही कायम आहेत. आता तर महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनही सुरु झाले. त्यामुळे ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारास अधिवेशनानंतरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात अनेक चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्राप्त माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कॅबिनेट आणि राज्य अशी मिळून 16 मंत्रीपद आलीयत. या सोळा मंत्रिपदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते यावर टाकलेली एक नजर.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या सरकारच्या पहिल्यावहिल्या शपथविधीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली होती. त्यामुळे 16 पैकी पहिली दोन मंत्रिपदं आगोदरच भरली गेली आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यात 14 मंत्रिपदं राहीली आहेत. त्यात आपला समावेश व्हावा यासाठी पक्षातून अनेक नेते इच्छूक आहेत. असे असले तरी काही प्रमुख चेहऱ्यांनाच मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. यात दत्ता भरणे, सुनील शेळके, धनंजय मुंडे, राजेश टोपे, यांचा समाश होऊ शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्यासाठी चर्चेत असलेल्या संभाव्य चेहऱ्यांमध्ये दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, बबन शिंदे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, धर्मराव बाबा अत्राम, सरोज अहिरे, इंद्रनील नाईक आदी आमदारांचाही समावेश होऊ शकतो. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवला बलात्कार प्रकरणातील नवा अहवाल; आरोपींना 100 दिवसांत फाशी देण्याची अहवालात असणार तरतूद)
राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड कायम असताना तिला लगाम लावण्याचा धाडसी प्रयोग शरद पवार यांच्या रुपाने शरद पवार यांनी केला. विशेष म्हणजे त्याला यशही आले. या राजकीय घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. सुरवातीला हा प्रयोग किती यशस्वी होतो याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले जात होते. मात्र, हा प्रयोग यशस्वी झाला आणि राज्याच्या राजकीय इतिहासात एक नवा प्रयोग लिहिला गेला. या प्रयोगाला विविध अंगं आहेत. त्या आंगाचा पुढचा टप्पा म्हणजे महाविकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार.