महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी (ShivSena-Congress-NCP) तिन्ही पक्ष एकत्र आल्याने राज्याला नवे सरकार मिळाले आहे. महाविकासआघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने निवड करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रीपदाची पदभार स्वीकारला आहे. उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कामगाजास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे कोणत्या मुद्द्यावर भर देणार? याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 30 नोव्हेंबरला रोजी बहुमत चाचणी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागून 1 महिन्याहून अधिक दिवस उलटल्यानंतर महाराष्ट्राला महाविकास आघाडीचे नवे सरकार मिळाले आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने अधिक जागा मिळवल्या असूनही मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद पेटला. दोन्ही पक्षही त्यांच्या एकमतावर ठाम असल्यामुळे 30 वर्षापासून असलेली युती अखेर तुटली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीलासोबत घेऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या कामकाजास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण
एएनआयचे ट्वीट-
Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray arrives at Mantralaya, the state secretariat. pic.twitter.com/1owH1taffJ
— ANI (@ANI) November 29, 2019
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिल्याने शिवसेना समर्थकांसह शेतकरी वर्गातही आनंदमय वातावरण निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अनेकदा शेतकऱ्यांशी संपर्क साधला आहे. तसेच उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ते योग्य निर्णय घेतली, अशी अपेक्षा केली जात आहे.