Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

महाराष्ट्रातील घटनेची नोंद केवळ राज्यानेच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. 50 आमदारांनी एकाच वेळी विश्वास दाखवणे ही साधी आणि वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. या घटनेची नोंद जगभरातील 33 देशांनी घेतली आहे. मी बोलतो कमी करुन अधिक दाखवतो. मला जे बोलायचे आहे ते मी सभागृहात बोललोच आहे. आता फार बोलणार नाही. परंतू, वेळ आली आणि आणलीच तर अधिक बोलायलाही कमी करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिला आहे. ते पंढरपूर येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते. शिवसेनेत (Shiv Sena) बंड केल्यानंतर आणि मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde on Shiv Sena Rebellion) प्रथमच जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

पंढरपूर येथे आयोजित मेळाव्यास शिवसेना बंडखोर आमादरांच्या गटातले तानाजी सावंत हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमास शिंदे यांना मानणाऱ्या गटात असलेल्या शिवसैनिकांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली होती. या वेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, माझ्यावर विश्वास दाखविण्याचे मोठे काम आमदारांनी केले आहे. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला आपण अजिबात तडा जाऊ देणार नाही. अगदीच वेळ आली तर मी टोकाचे पाऊल उचलेन परंतू, आमदारांनी दाखवलेल्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. (हेही वाचा, Eknath Shinde Viral Video: माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे दारूच्या नशेत? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमागील सत्य (Watch))

आज तुमच्या समोर जो उभा आहे तो एकनाथ शिंदे हा धर्मवीर आनंद दिघे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतून तयार झाले आहे. पाठिमागच्या 20 ते 22 वर्षांमध्ये माझ्यावर अनेक अडचणींचे प्रसंग आले. मी खचलो नाही. आताही मी डगमगणार नाही. मी फक्त इतकेच सांगेन की माझ्या टीकाकारांना मी कामातूनच उत्तर देईन. कारण मी सहनशिल आहे. बोलतो कमी करतो अधिक.