Lokmanya Tilak Award To PM Narendra Modi: भारतीय जवानांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या बातम्या आपण ऐकतो. पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला हा देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता, असे गौरवोद्गार शरद पवार (Sharad Pawar) यांनी काढले आहेत. टिळक स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मी प्रधानमंत्र्यांना सांगू इच्छितो. देशात आणि महाराष्ट्रात फुले आणि शाहु महाराजांच्या इतिहासाला मोठे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेला इतिहास या भूमित रचला गेला. छत्रपतींचा जन्मच या ठिकाणी झाला. देशात अनेक राजे होऊन गेले. ते सर्व राजे त्या राज्यांसाठी ओळखण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य वेगळ्या कारणांनी ओळखले जाते. कारण हे राज्य केवळ भोसल्यांचे नव्हते तर जनते, रयतेचे राज्य होते. म्हणून ते स्वराज्य म्हणून ओळखले गेले. अशा या भूमिक अनेक महत्त्वाची व्यक्तीमत्वे घडली. (हेही वाचा, PM Modi's Pune Visit: लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा, घ्या जाणून)
लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्र आणि पत्रकारितेच्या माध्यमातून ब्रिटीशांवर दबाव टाकला. प्रहार केला. पत्रकारिता आणि आपल्या राजकीय नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्याची मशाल पेटवली. त्या काळात मवाळ आणि जहाल असे दोन गट होते. ब्रिटीशांविरोधी लढणाऱ्या जहाल गटाचे नेते म्हणून लोकमान्य टिळकांना ओळखले जायचे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसुत्रीचा अवलंब टिळकांनी केला. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे कार्यक्रम सुरु केले. त्यामुळे त्यांच्या कार्यला आमच्या मनामध्ये महत्त्व आहे.