आजचा दिवस माझ्यासाठी खास भाग्याचा आहे. लोकमान्य टिळक यांच्याशी थेट जोडल्या गेलेल्या संस्थेकडून हा पुरस्कार मला भेटतो आहे. त्यामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. याच कारणासाठी मी देशवासीयांना शब्द देतो. मी देशवासीयांच्या मदतीमध्ये, सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहू देणार नाही. हा पुरस्कार मी देशातील 140 कोटी जनतेला समर्पीत करतो. या पुरस्कारापोटी मिळणारी एक लाख रुपयांचा आर्थिक निधी मी नमामी गंगे उपक्रमाला अर्पण करतो, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक स्मारक ट्रस्ट द्वारा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. दरम्यान, व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, टिळक ट्रस्टचे दीपक टीळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. टिळक स्मारक ट्रस्टचे दीपक टिळक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला. भारताच्या स्वातंत्र्यात लोकमान्य टिळकांची भूमिका, त्यांचे योगदान काही घटना आणि शब्दांत मांडता येणार नाही. आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात सांगितले की, माझ्यासाठी हा संस्मरणीय क्षण आहे. (हेही वाचा, Sharad Pawar On Surgical Strike: देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार)
ट्विट
Prime Minister Narendra Modi says "The role of Lokmanya Tilak in India's independence, his contribution cannot be summed up in a few incidents and words." pic.twitter.com/7NMSIxGGJk
— ANI (@ANI) August 1, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, इंग्रज जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचारही करत नव्हते तेव्हा लोकमान्य टिळकांनी भारत माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे ठासून सांगितले. इंग्रजांच्या पूर्ण धारणा लोकमान्य टिळकांनी खोट्या ठरवल्या. लोकमान्यांच्याय धोरणामुळे भारतीय आंदोलनाची दिशा बदलली. म्हणून त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून संबोधले गेले. महान नेता तोच असतो जो केवळ स्वप्न पाहात नाही. तर ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तशा गोष्टीही तयार करतो. लोकमान्य टिळकांनी अशा सर्व गोष्टी तयार केल्या असे त्यांचे जीवन दाखवते. त्यांनी भारतासाठी त्याग आणि बलिदानाची पराकाष्टा केली, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.