Suicide Case: महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या शुभ सणाच्या दिवशी जिल्ह्यात एका मुलाने बहीणीच्या घरी गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. बलुजा परिसरात बजाजनगरात बुधवारी ही घटना घडली आहे. आकाश सर्जेराव शिंदे (३०) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आकाश काही वर्षांपासून बहिणीच्या घरी राहत होता. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच, मृतदेह ताब्यात घेतला.
रक्षाबंधनाच्या दिवसी भावाने बहिणीच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आकाशची बहिण आणि तीचा पती दोघेही बुधवारी कामाला निघून गेले. दरम्यान आकाशने घरी गळफास लावून घेतला. आकाशची बहिण सुनंदा हीला त्याने रक्षाबंधन निमित्त घरीत थांबणार असल्याचे सांगितले. कामावरून आल्यावर रक्षाबंधन साजरा करू असे सांगितले.
दुपारच्या वेळी सुनंदा घरी परतल्या बऱ्याच वेळ दरवाजा ठोकला आणि आवाज सुध्दा दिल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया घरीतून आली नाही. सुंनदाने खिडकीतून पाहीले तेव्हा आकाश हा लटकलेल्या अवस्थेत दिसला. सुनंदाने जोरजोरात आक्रोश केला. परिसरातील नागरिक देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेतला. पोलीसांनी अकस्मान मृत्यूची नोंद घेतली. मृतदेह ताब्यात घेतला. घराची तपसाणी केल्यावर पोलिसांना चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत आकाश तणावात असल्याचे समजून आले. ताई मला माफ कर, आईची काळजी घे असे लिहित आत्महत्या केली.