Gun Shot | Pixabay.com

मुंबईत पुन्हा भर रस्त्यात गोळीबाराची घटना समोर आली आहे.  चेंबूर (Chembur) मध्ये बुधवार 9 एप्रिलच्या रात्री 10 च्या सुमारास एका सिग्नल जवळ बाईकस्वारांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना डायमंड गार्डन (Diamond Garden) भागातील आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर तो भाग कॉर्डन ऑफ करण्यात आला असून या प्रकरणी पोलिस संबंधित गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक एक्सपर्ट टीम देखील दाखल झाली असून त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

Navnath Dhawale, DCP Zone 6 यांनी दिलेल्या माहितीनुसार, "डायमंड गार्डन सिग्नलवर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. सिग्नलवर एक कार थांबली तेव्हा दोन दुचाकीस्वारांनी कारमधील व्यक्तीवर गोळीबार केला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तो आता धोक्याबाहेर आहे." (Navi Mumbai Firing: सानपाडा येथे डी मार्ट परिसरात गोळीबार; पाच ते सहा राउंड फायर, पोलीस घटनास्थळी दाखल).

चेंबूर पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, जखमींमध्ये 50 वर्षीय सदरुद्दीन खान यांचा समावेश आहे. गोळी लागल्याने त्याला झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. ते नवी मुंबईतील बेलापूर येथे जात होते जिथे ते राहतात.