महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणू संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा आढावा घेतला आहे. राज्यात शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक तसेच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच शिक्षण विभागाने शाळेत हात धुण्यासाठी जंतूनाशक व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणावेत. शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करावे. तसेच संपूर्ण साक्षरतेचा विचार ही संकल्पना घेऊन आता आपण पुढे जाऊ, असे ही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्डच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा पर्यायही उपलब्ध होईल, असा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. यासाठी मोबाईल कंपन्यांचेही सहकार्य घेण्यात यावे. शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना द्या, असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घेऊन यानिमित्ताने ऑनलाइन नेटवर्कही बळकट करून घ्यावे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व शिक्षण क्षेत्रातील सर्वांशी समन्वय राखावा, सर्वांची मते विचारात घ्यावीत. टीव्ही चॅनल्सचाही यासाठी उपयोग करून घ्यावा, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: भाजपा महाराष्ट्राचा मित्र की शत्रू? केंद्राकडून राज्याला पुरेसे एन 95 मास्क, व्हेंटीलेटर मिळालेच नाहीत; जयंत पाटील यांचा घणाघात, देवेंद्र फडणवीस यांच्या आकडेवारीची पोलखोल

ट्वीट-

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात शाळा सुरु होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महत्वाचे म्हणजे, शाळा सुरु न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना राबवल्या जात आहे.