![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/07/93-68-380x214.jpg)
Mumbai Local Mega block: लोकल प्रवाशांसाठी महत्वाची माहिती. रविवारी 14 जुलै रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक जारी करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर येत्या रविवारी 14 जुलैला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे विभागाने प्रसिद्धी पत्रक काढत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते दिवा दरम्यान 5वी आणि 6वी लाईन सकाळी 10.50 वाजेपासून ते दुपारी 03.20 पर्यंत काम सुरु राहील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान ह्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस हितून सुटणाऱ्य अप आणि डाउन फास्ट ट्रेन ठाणे ते कल्याण द्वारा स्लो रुळावरून काढण्यात येईल. हेही वाचा: Mumbai Local Train Roof Leak: लोकल ट्रेनच्या छताला गळती; मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा प्रवाशांना फटका (Watch Video)
#मेगा_ब्लॉक दिनांक १४/०७/२०२४ (रविवार)@Central_Railway @YatriRailways pic.twitter.com/1sINDOn0qx
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 13, 2024
पश्चिम मार्ग
व पश्चिम मार्गावर रविवारी रात्री 12 : 15 वाजल्यापासून ते सकाळी 4 : 15 वाजे पर्यंत मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक जारी करण्यात आला आहे.या ब्लॉक दरम्यान उप आणि डाउन मार्गावरील सर्व जलद लोकल सेवा संताक्रुज ते चुरचगटे रेल्वे स्थानक दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे मार्ग
हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11: 10 वाजल्यापसून ते दुपारी 4:10 वाजे पर्यंत कुर्ला तेवशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉकक जारी करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल, वाशी,बेलापुर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तसच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुण येणाऱ्या ट्रेन देखील बंद राहतील.