Gopichand padalkar

Indapur: महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी एल्गार मेळावा इंदापूर येथे आयोजित केला. दरम्यान सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि महाराष्ट्र विधान परिषद (MLC) सदस्य गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी पुण्यातील इंदापूरला भेट दिली. या मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे (RPC) नेते महादेव जानकर आणि राज्यातील विविध प्रमुख ओबीसी नेत्यांचाही सहभाग होता. इंदारपूर येथे मेळावा संपल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला, गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजा विरोधात भाषण दिल्यामुळे कार्यकत्यामध्ये राडा झाला.

इंदापूर येथे झालेल्या राड्यात गोपीचंद यांच्यावर चप्पल फेक करण्यात आली आहे. त्यामुळे मुद्दा आणखी पेटला आहे. दरम्यान ही चप्पल फेक मराठा आंदोलन कर्त्यांनी केल्याचा आरोप ओबीसी कार्यकर्त्यांनी केला आहे.  मराठा कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्यावर चप्पल फेकल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. या संतापजनक घटनेनंतर मंत्री छगन भुजबळांनी एक्स वर पोस्ट शेअर केलं आहे, त्यात मराठा आरक्षणाचा मांडून, जशांत तस उत्तर दिलं जाईल' अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण मुद्दा ऐरणीवर आला आहे.  (हेही वाचा-नवाब मलिक यांनी आपली भूमिका अधिकृतपणे मांडल्यानंतर मी माझा मुद्दा मांडणार

चप्पल हल्लेचा व्हिडिओ

ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटलं की, तुमच्या जमिनी कोणी घेतल्या, त्या ठिकाणी कारखाने कोणी उभे केले, त्यामध्ये सुतगिरण्या, बॅंका, कॉलेज कोणी उभी केली. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कोणी नादवलं कोणी, मराठा समाजाच्या पोरांना भरती केलं ते पैसे कुणी घेतले. ते पैसे घ्यायला तर ओबीसी आले नव्हते. मराठा समाजाने तुमचा सुर्याजी पिसाळ कोण आहे, हे ओळखलं पाहिजे, असं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं. दरम्यान त्यांचं हेच वक्तव्य त्यांना भोवलं असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.