
शेतात चारा खायला गेलेल्या बैलावरुन निर्माण झालेला वाद एकाच्या जीवावर बेतला आहे. चंद्रपूर (Chandrapur) येथील पोंभुर्णा (Pombhurna) तालुक्यातील बोर्डा दीक्षित गावात गाव शिवारात ही घटना घडली. बैल आपल्या शेतात चारा खायला गेल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यातून एकाने 75 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. किसन लिंगाजी कुमरे (वय 75 वर्षे) असे मृताचे नाव आहे. घटना घडल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी किसन कुमरे यांचा मृततेही आरोपीच्या घरी नेऊन ठेवला. त्यामुळे आगोदरच काहीसे तणावयूक्त असलेले गावातील वातावरण आणखीच तणावाचे बनले.
पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थली हजेरी लावील. तसेच, गावात दंगल नियंत्रण पथकही तैनात केले. घटनेबाबत माहिती अशी की, गावातील एका व्यक्तीचा बैल किसन कुमरे यांच्या सांदवडीत चरायला गेला. त्यामुळे आरोपी आणि कुमरे यांच्यात वाद झाला. आरोपीने टोकाचे पाऊल उचलत थेट किसन कुमरे यांची हत्याच केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. (हेही वाचा, Leopard Attack News: बिबट्याने घराच्या अंगणातून मुलाला उचलले, शेतात नेऊन खाल्ले; चंद्रपूर येथील घटना)
गावकऱ्यांना असे काही घडले याची यतकिंचीतही अपेक्षा नव्हती. त्यामुळे घडल्या प्रकारामुळे गावकरी हादरुन गेले. आरोपींना अटक करावी तर आम्ही आरोपीच्या घरुन मृतदेह उचलू. जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका मृतांच्या कुटुंबीयांनी घेतली.
दरम्यान, पोलिसांनी केशव गेलकीवार, दामोदर गेलकीवार, अक्षय गेल्कीवार, शुभम गेलकीवार, तुळशिदास गेल्कीवार अशा पाच आरोपींना अटक केली आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून तपासही सुरु केला आहे.