Smoke| Used For Representational Purpose | PC: Pixabay.com

चंद्रपूर (Chandrapur) मध्ये दुर्गापूर (Durgapur) मध्ये जनरेटर मधून कार्बन डाय ऑक्साईड (Carbon dioxide) या वायूची गळती झाल्याने एका कुटुंबाचा झोपेतच मृत्यू झाल्याची मनाला विषण्ण करणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये मृत व्यक्तींमध्ये 8 वर्षांच्या मुलाचा तर 14 वर्षाच्या एका मुलीचादेखील समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, ही दुर्दैवी घटना रमेश लष्कर यांच्या घरात घडली आहे. आज (13 जुलै) पहाटे हा प्रकार समोर आला आहे. रमेश लष्कर यांच्या घरात असलेल्या जनरेतर मधून कार्बन डाय ऑक्साईड हा विषारी वायू अचानक गळायला सुरूवात झाली. यावेळेस सारेच झोपेमध्ये होते. वायू गळतीमुळे काही वेळातच सारे गुदमरले आणि बेशुद्ध पडले. सकाळी कुटुंबामधील कुणीच बाहेर न आल्याने आजूबाजूच्या कुटुंबानी घराचा दरवाजा तोडला. यावेळेस त्यांना सारेजण बेशुद्ध पडलेले दिसले. तातडीने त्यांना नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र 7 पैकी 6 जणांना मृत घोषित करण्यात आले. तर एका महिलेवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. (नक्की वाचा: लज्जास्पद! शेतजमिनीच्या वादातून 18 वर्षीय मुलाने जन्मदात्या पित्याची हत्या करुन रेल्वे रुळावर टाकला मृतदेह, चंद्रपूरातील घटना).

ANI Tweet 

दुर्दैवी गोष्ट म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच या कुटुंबात एक विवाहसोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर अशा दुर्घटनेत सार्‍या कुटुंबावर नियतीने घाला घातला.