Mamata Banerjee Injured: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी; दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना घसरला पाय
दुर्गापूर येथे हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना त्यांचा पाय घसरला. त्याला सध्या आसनसोल येथे नेण्यात आले आहे. या घटनेशी संबंधित व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या खाली पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
Mamata Banerjee Injured: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुन्हा एकदा जखमी झाल्या आहेत. दुर्गापूर (Durgapur) येथे हेलिकॉप्टर (Helicopter) मध्ये चढत असताना त्यांचा पाय घसरला. त्याला सध्या आसनसोल येथे नेण्यात आले आहे. या घटनेशी संबंधित व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या खाली पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी त्यांना उचलण्यासाठी धावले.
याआधीही ममता बॅनर्जी अनेकदा जखमी झाल्या आहेत. नुकत्याच ममता बॅनर्जी त्यांच्या राहत्या घरी जखमी झाल्या होत्या. कॅम्पसमध्ये चालत असताना त्या पडल्या. त्यानतंर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे त्यांना टाकेही देण्यात आले. (हेही वाचा -'नुकसान करण्याशिवाय भाजपने कोणाचेही भले केले नाही'; मालदा येथील सभेतून ममता बॅनर्जी यांची जोरदार टीका)
पहा व्हिडिओ -
#WATCH | West Bengal CM Mamata Banerjee slipped and fell while taking a seat after boarding her helicopter in Durgapur, Paschim Bardhaman today. She reportedly suffered a minor injury and was helped by her security personnel. She continued with her onward travel to Asansol. pic.twitter.com/UCt3dBmpTQ
— ANI (@ANI) April 27, 2024
यापूर्वी 2021 च्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांना नंदीग्राममध्ये काही लोकांनी ढकलले होते, त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. रेयापारा येथील मंदिराबाहेर घडलेल्या या घटनेचे वर्णन त्यांनी कटाचा भाग म्हणून केले होते.
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2024 03:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

