Hottest City in World: विदर्भात उन्हाचा तडाखा चांगलाचं वाढला आहे. उन्हाच्या लाटेने रौद्ररूप धारण केले असून मागील काही दिवसापासून चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी चंद्रपूर जिल्ह्याने सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा उच्चांक गाठला. ब्रम्हपुरी (Bramhapuri) देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंदल्या गेले. ब्रम्हपुरीत 45.3 अंश. से. आणि त्याखालोखाल चंद्रपूर देशात सर्वाधिक दुसरे उष्ण शहर ठरले. चंद्रपूरचा पारा 45.3 अंशावर गेला आहे.
मंगळवारी चंद्रपुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली. त्यानंतर, सलग दुसऱ्या दिवशी चंद्रपूर व ब्रम्हपुरीने जगाच्या तापमानात सर्वाधिक हॉट शहर म्हणून अव्वलस्थान गाठले आहे. चंद्रपूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. (हेही वाचा - Weather Update: मुंबईत येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता, वातावरणामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी - हवामान विभाग)
दरम्यान, येत्या काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. चंद्रपूर शहरात उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली जाते. यावर्षी पहिल्यांदाच मार्च महिन्यापासूनच चंद्रपूरचा पारा चढला असल्याचे दिसून आले. 31 मार्च रोजी तब्बल 44 डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील तापमान वाढत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहर हे जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरेल असून त्यानंतर चंद्रपूर हे दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकामध्ये अकोला शहराचा सामावेश आहे. अकोल्याचे शहराचे तापमान 44.9 डिग्री नोंदवण्यात आले आहे. विदर्भातील अनेक शहरांनी उष्णतेचा उच्चांक गाठला आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे चंद्रपूरकर होरपळून निघत आहेत.