चंद्रपूर येथे रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, अधिक तपास सुरु
Leopard Death (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur) मधील ताडोबा अभयारण्य हे खासकरुन व्याघ्र सफारीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु या ठिकाणी वाघांची संख्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र आज (8 ऑक्टोंबर) चंद्रपूर मधील मुळ जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाच्या येथे रेल्वेची जोरदार धडक बसल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी ही नाशिक मधील डुबेरे-सोनेरी गावाकडे रात्रीच्या वेळेस रस्त्यावरुन बिबट्याची मादी आणि तीन बछडे जात होते. त्यावेळी रस्त्यावरुन जोरात वेगाने आलेल्या गाडीने बछड्यांना धडक दिली. या धडकेत दोन सहा महिन्यांचा बछड्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता आज पुन्हा एकदा बिबट्याला रेल्वेची धडक लागल्याचा प्रकार घडला आहे.(मुंबई: मरोळ येथील Woodland Crest सोसायटीत बिबट्या शिरल्याने खळबळ Watch Video)

तसेच चंद्रपूर येथे एक महिला घराच्या अंगणात रात्रीच्या वेळेस झोपल्या असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच बिबट्याने या महिलेला ओढत जंगलात नेले असल्याची बाब सुद्धा समोर आली आहे. या प्रकरणी महिलेचा मृत्यू झाला आहे.

तर शहरी भागात बिबट्या दिसण्याचं प्रमाण वाढलं आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या काहींना मानपाड्याच्या उद्यानात बिबट्या दिसला. बिबट्या पाहून काहींनी आरडाओरडा केला. लोकांची गर्दी पाहून बिबट्याही काही वेळातच तेथून पळाला. मुंबईतही नगरी वस्तीमध्येही अनेकदा बिबट्या पहायला मिळाला होता.