MNS-BJP | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि भाजप (BJP) यांच्या संभाव्य युतीबाबत (BJP-MNS Alliance) आज कोणताही चर्चा झाली नाही. आमची भेट ही सर्वसाधारण भेट होती. आम्ही पाठिमागे नाशिकला काही काळासाठी भेटलो होतो. त्यानंतर राज यांनी मला एकदा घरी या असे निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाचा स्वीकार करुन मी आज आलो होतो, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होत. या भेटीबाबत प्रसारमाध्यमं आणि महाराष्ट्रतील राजकीय वर्तुळाला मोठी उत्सुकता होती.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, एकमेकांना भेटणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. दोन हिंदू व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा सहाजिकच ते एकमेकांना म्हणतात पुन्हा भेटू या. माझी आणि राज ठाकरे यांची नाशिक येथे भेट झाली तेव्हा भेटीत राज ठाकरे यांनी मला निमंत्रण दिले होते. या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. मी चंद्रकांत पाटील म्हणून भेटायला आलो आहे. प्रसारमाध्यमांतून लगेच चर्चा सुरु झाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष भेटायला गेले म्हणून. पण तसे काही नाही. मनसे-भाजप युतीबाबत आज कोणतीही चर्चा झाली नाही. (हेही वाचा, BJP-MNS Alliance: चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात आज भेट; राजकीय वर्तुळात मनसे-भाजप युतीच्या चर्चा)

चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितले, मी एक व्यक्ती म्हणून त्यांना परप्रांतीयांबद्दल त्यांची असलेली भूमिका बदलावी अशी विनंती केली. ही विनंती मी त्यांना राजीकय नेता म्हणून केली नाही. या वेळी त्यांच्यासोबत अनेक विषयांवरुन चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या वाचनाबद्दल मला आश्चर्य वाटले. आज ते जे भूमिका घेऊन चलले आहेत. प्रामुख्याने परप्रांतियांबद्दल ते पाहता त्यांना महाराष्ट्राचे नेत हेण्यास खूप वेळ लागेल. त्यांना महाराष्ट्राचा नेता म्हणून बघू इच्छिणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात असल्याचेही, चंद्रकांत पाटील या वेळी म्हमाले.