IMD High Sea Waves Alert: मुंबईत येत्या 36 तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता; BMC जारी केली ॲडव्हायझरी
Seaside Mumbai | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

IMD High Sea Waves Alert: मुंबईत येत्या 36 तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आह. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने ॲडव्हायझरी जारी केली आहे. लोकांनी अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन (INCOIS) नुसार, शनिवार सकाळी 11.30 ते रविवारी रात्री 11.30 वाजेपर्यंत समुद्रात लाटा उसळतील. या कालावधीत सल्ल्यानुसार, लाटांची उंची 0.5 ते 1.5 मीटरने वाढण्याची अपेक्षा आहे.

बीएमसीने मच्छीमारांनाही परिस्थिती लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बीएमसी आयुक्त भूषण गागारिन यांनी नागरी अधिकाऱ्यांना पोलिसांच्या सहकार्याने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, शहरातील समुद्रकिनाऱ्यांवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लोकांना पाण्यात जाण्यापासून रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Maharashtra Heat Wave: मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा)

समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 36 तासाच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे, असा सल्लाही मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे.

तथापी, महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमान 5-6 डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.