मध्य रेल्वेकडून (Madhya Railway) दिवाळीपूर्वी तिकिटांच्या संदर्भातील घोटाळा समोर आला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत येणारे प्रवासी अनधिकृत पद्धतीने त्यांच्या शहरातून तिकिट खरेदी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी प्रवाशांना ई-तिकिट दिले जात असून त्यासाठी बेकायदेशीर सॉफ्टवेअर आणि व्हॉट्सअॅपचा वापर करुन प्रवाशांना तिकिट पाठवले जात होते.या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, प्रवाशांना त्यांचे तिकिट बनावट असल्याचे ही कळून आले नाही. तर रेल्वे स्थानकात जाऊन तिकिट बुकिंग करण्याऐवजी प्रवाशांनी या पद्धतीने तिकिटांची खरेदी केली. तिकिट खरेदी करणारे प्रवासी हे प्रयागराज, चौओकी आणि दरभंगा येथील असून त्यांना प्रतिदिनी असलेल्या कोटा अंतर्गत कन्फर्म तिकिट दिले गेले होते. प्रत्येक प्रवाशाने तिकिटाव्यतिरिक्त अधिक 500 रुपये देऊन त्याची प्रिंटआउट्स सुद्धा काढली होती.
तर रेल्वे सुटणार्या शहरांव्यतिरिक्त इतर स्थानकांवरून रेल्वेची तिकिटे खरेदी करणे बेकायदेशीर आहे. जुन महिन्यात मध्य रेल्वे कडून अशाच पद्धतीच्या तिकिटांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. तर मुंबईतून तिकिट खरेदी करुन नॉर्थ स्टेट्स मध्ये ती कुरियरने पाठवली जात होती.(Huljanti Mahalingraya Yatra: सोलापूर येथे हुलजंती महालिंगराया यात्रेदरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; 74 जणांवर गुन्हा दाखल)
सध्याच्या ई-तिकिट घोटाळ्यात 30 जणांचा आसनगाव, अंबरनाथ, भिवंडी, बदलापूर, टिटवाळा, ठाणे, कल्याण आणि सीएसएमटी येथून अटक करण्यात आली आहे. या लोकांकडून लहान रेल्वे स्थानकांची तिकिट खरेदी करण्यासह कमी गर्दी आणि जेथे तिकिट तपासण्याची शक्यता कमी असते अशा स्थानकांचा निवड करायचे. यामुळे मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट बनावट असल्याने पकडले जायचे. तसेच दलाल लोकांना पेपर स्वरुपातील तिकिटांची विल्हेवाट लावत असताना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या टोळीचा शोध घेण्यासह त्यांचे डिलिट केलेले व्ह़ॉट्सअॅप मेसेज सुद्धा मिळवले जात असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.