Central Railway Mumbai | (Photo Credits: Archived, Edited, Representative image)

मागील काही दिवसात पावसामुळे मध्य रेल्वेच्या(Central Railway)  सेवेला जबर फटका बसल्याने प्रवासी व चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता, यानंतर काल संध्याकाळी मध्य रेल्वेची सेवा पुर्वव्रत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले मात्र तरीही आज सकाळी सुद्धा लोकल उशिरानेच धावत होत्या . अशातच आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेने आपले रेल्वेचे वेळापत्रक आज रविवारच्या वेळापत्रकानुसार चालणार असल्याची घोषणा केल्याने नागरिकांना आणखीनच मनस्ताप सहन करावा लागला होता, या एकूण प्रकरणामुळे जवळपास सर्वच स्थानकांवर प्रवाश्यांची गर्दी वाढत होती यामुळे  झालेली गैरसोय, गोंधळ, मुंब्रा-कळवा स्थानकांदरम्यान महिलेसह तिघे पडल्याची घटना,  हे सर्व  लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने रविवार वेळापत्रक रद्द करत असल्याची माहिती दिली आहे.

मध्य रेल्वे ट्विट

दरम्यान  मध्य रेल्वेने जरी आपले रविवारचे वेळापत्रक रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी , ऐन गर्दीच्या वेळी, तसेच ऑफिसच्या वेळा गाठण्याच्या कालावधीनंतर हे वेळापत्रक रद्द करण्यात आल्याने चाकरमान्यांना याचा फारसा फायदा झाला नाही.Mumbai Local Train, Traffic Updates: मुंबई मध्ये पावसाची उसंत मात्र रेल्वे, विमान, रस्ते वाहतूक अद्याप विस्कळीत; लोकल ट्रेनला गर्दी पाहता मध्य रेल्वे चालवणार विशेष गाड्या

असे असले तरी, मध्य रेल्वेने लोकलचे वेळापत्रक नियमित केल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठाच दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे पुन्हा संध्याकाळी होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवाशांची तारांबळ टाळता येणे शक्य झाले आहे. शिवाय या मुळे संभाव्य अपघातही टळणार आहेत. सकाळी कामावर जाताना प्रचंड हाल सोसणाऱ्या चाकरमान्यांना आज संध्याकाळी वेळेत घरी जाता येणार आहे.