3 July Mumbai Traffic Updates: मुंबईमध्ये 29 जून पासून कोसळणार्या पावसाने कालपासून थोडी उसंत घेतली आहे. मागील काही दिवस सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. काल संध्याकाळी पाण्याचा निचरा होण्यास सुरूवात झाल्यानंतर हळूहळू विस्कळीत झालेलं जनजीवन स्थिरावत आहे. मात्र आज कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मात्र मर्यादीत धावणार्या लोकल ट्रेन्स आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई लोकल आज रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्याने लोकल ट्रेनमध्ये मोठी गर्दी आहे. तर इतर वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेची आज अवस्था काय?
मुंबई लोकल ट्रेन -
मुंबईमध्ये तिन्ही मार्गावर लोकल ट्रेन किमान 15-20 मिनिटं उशिराने धावत आहे. 2 जुलै दिवशी मुंबईच्या रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने अनेक लोकल फेर्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच पश्चिम मार्गावरील एसी लोकल बंद ठेवण्यात आली होती. मात्र आज एसी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. High Tide In Mumbai: आज दुपारी 12:35 वाजता समुद्रात उसळणार 4.69 मीटर लांबीच्या लाटा, येथे पाहा समुद्री भरतीची संपुर्ण यादी
ANI Tweet
Central Railway PRO: Arranged extra trains from Dombivli, Thane to clear extra rush. We are also running special trains apart from Sunday schedule. #MumbaiRains pic.twitter.com/6WAoZMXghH
— ANI (@ANI) July 3, 2019
रस्ते वाहतूक -
मुंबई लोकल ही या शहराची लाईफ लाईन आहे. आज रेल्वेचं वेळापत्रक मर्यादीत असल्याने त्याचा ताण रस्ते वाहतूकीवर दिसून आला आहे. पावसाळ्यात मुंबईच्या रस्स्त्यांची चाळण झाल्याने रस्स्ते वाहतूकीचा वेग मंदावला आहे. मात्र त्यासोबतच आज लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी वाहनं रस्स्त्यावर काढल्याने वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. मुंबईत मुलुंड टोल नाका ते विक्रोळी दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळतात.
विमानसेवा
#UPDATE: The main runway at Mumbai airport is still closed; secondary runway being operated. Besides cancellations, operations are smooth.
— ANI (@ANI) July 3, 2019
मुंबईच्या एअरपोर्टवर 1 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे विमानसेवा विस्कळीत झाली होती. त्यावेळेस स्पाईस जेटचं विमान ओव्हर शूट झाल्याने रनवे खराब झाला आहे. आज रात्रीपर्यंत रनवे बंद ठेवण्यात आला आहे. काही विमानं वळवण्यात आली आहेत. 200 आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक विमान रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे आज मुंबई एअरपोर्टवरून प्रवास करणार्यांना विमानाचं स्टेट्स पाहूनच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1974 नंतर जुलै महिन्यात इतका पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना आहे. हवामान खात्याने पुढील 48 तास मुंबई सह महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.