रविवार पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने आज सकाळपासून थोडी विश्रांती घेतली असली तरीही मुंबईवरील अतिवृष्टीचा धोका टळला नाहीय. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा सुरु झाली असली तरीही ती रविवारच्या वेळापत्रकानुसार धीम्या गतीने सुरु आहेत. तसेच पुढील 2 दिवस मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यातच आज दुपारी 12:35 वाजता समुद्राला मोठी भरती येणार असल्याचे BMC च्या वेळापत्रकात म्हटले आहे.
मुंबईतील समुद्रात 4.69 मीटरच्या लाटा उसळणार असून संध्याकाळी 6:34 वाजता मध्यम स्वरुपाच्या लाटा उसळणार आहे.
#MumbaiRains : High tide of about 4.69 meter expected at around 12:35 pm & low tide of about 1.58 meter expected at 06:34 pm today.
— ANI (@ANI) July 3, 2019
येथे पाहा समुद्र भरतीचे संपुर्ण वेळापत्रक
list of high tide and low tide @MumbaiLiveNews @mybmcSWM #Mumbai pic.twitter.com/ue4EaTwntH
— Nitesh kumar dubey (@nitesh30dubey) June 28, 2019
या यादीप्रमाणे जुलै महिन्यात 5 तारखेला, ऑगस्ट मध्ये 3 तारखेला आणि सप्टेंबरमध्ये 1 तारखेला मोठी भरती येणार असल्याचे सांगण्यात येतय.
त्यामुळे High Tide च्या दृष्टीने बीएमसीने खबरदारीचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही याचीही विशेष काळजी घेतली जाईल, या दृष्टीने मुंबई महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.