Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

देशभरासह राज्यात अखेर दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. तर सर्वत्र धनतेरस साजरी केली जाणार असून एकमेकांना त्या बद्दल शुभेच्छा दिल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा धनत्रयोदशीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, आपणा सर्वांना दीपावली आणि आजच्या धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात उत्साह, आनंद, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन अशी सदिच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांनी ट्विट मध्ये पुढे असे ही म्हटले आहे की, दिवाळी आनंदात, उत्साहात साजरी करा. पण त्यावेळी कोरोनाच्या नियमांचे सुद्धा नागरिकांनी पालन करावे असे आवाहन केले आहे. त्याचसोबत यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असल्याने ती अत्यंत साधेपणाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.(Firecrackers Ban in Mumbai: दिवाळी मध्ये यंदा लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी केवळ 2 तास फुलझडी, अनार उडवण्यास परवानगी; BMC ने जारी केली नियमावली)

दरम्यान, गेल्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रथम दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेचराज्यात  प्रदुषण करणारे फटाके टाळण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकणी फटाके वाजवू नका असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दिवाळी आणि त्यानंतरचे पुढील 15 दिवस अत्यंत महत्वाचे असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.