केरळमधील (Kerala) कोझिकोड च्या (Kozhikode) आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या भीषण अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसचे वैमानिक, भारतीय हवाई दलाचा (IAF) सर्वोच्च असा स्वॉर्ड ऑफ (Sword Of Honour) ऑनर पुरस्कार प्राप्त विंंग कमांडर कॅप्टन दीपक साठे (Deepak Sathe) यांचे निधन झाले, रविवारी साठे यांचे पार्थिव मुंंबईतील एअर इंडिया इमारतीत आणण्यात आले होते. त्यांंच्या पार्थिवावर अंंत्यसंस्कार करण्याबाबत एक महत्वाची घोषणा आज महाराष्ट्र सरकारतर्फे (Maharashtra Government) करण्यात आली आहे. महाराष्ट्र मुख्यमंंत्री कार्यालयातुन देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवंगत दीपक साठे यांंच्या पार्थिवावर राज्यात शासकीय इतमामात अंत्यसंंस्कार होणार आहेत. Sword of Honor असलेल्या वैमानिक दीपक साठे यांचा केरळमधील कोझिकोड येथे Air India विमान अपघातात मृत्यू
महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयातुन करण्यात आलेल्या ट्विटनुसार, साठे यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीने पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी इतिहास रचला आहे. त्यांंच्या आयुष्याकडे पाहुन अनेकांना आकाशाला स्पर्श करण्याचे बळ मिळेल त्यामुळे त्यांना मानवंंदना म्हणुन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एअर इंडिया एक्स्प्रेस विमान अपघातात मरण पावलेले वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबियाची घेतली भेट
महाराष्ट्र CMO ट्विट
विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीने पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी इतिहास रचला आहे. त्यांना मानाचा मुजरा आणि स्मृतींना विनम्र श्रद्धांजली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 11, 2020
दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर विमानतळावर हे विमानधावपट्टीवरून घसरले आणि खड्डयात कोसळले होते. हा अपघात एवढा भीषण होता की, विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते भिंतीवर आदळून 30 फुटी खड्ड्यात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले. या भयंकर अपघातात दोन्ही वैमानिकांंसह 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, 127 जण जखमी झाले आहेत.