जयपूरमधील कवी बप्पादित्य सरकार आपल्या उबर ड्राईव्ह दरम्यान सीएए-एनआरसी विरोधात बोलत असल्याने त्यांचा उबर चालक चक्क त्यांना घेऊन सांताक्रूझ पोलीस स्टेशन (Santacruz Police ला गेला इतकंच नव्हे तर तिथे जाऊन या ड्रायव्हरने कवींच्या अटकेची सुद्धा मागणी केली. देशभरात CAA वरून वादविवाद सुरु असताना हा एकूण प्रकार मागील काही दिवसात चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे कालच या ड्रायव्हरचे कौतुक करून भाजपने त्यांचा सत्कार केला होता इतकंच नव्हे तर भाजपा (BJP) कडून चालकाला अलर्ट सिटिजन अवॉर्ड (Alert Citizen Award) देण्यात आला होता मात्र पॅसेंजरला त्रास झाल्याच्या आरोपावरून आता उबर (Uber) कडून चक्क या ड्रायव्हरला नोकरीवरून बडतर्फ केले गेल्याचे समजतेय. Shaheen Bagh Protest: शाहीन बाग प्रदर्शनात सामील होणाऱ्या 4 महिन्यांच्या बाळाचा थंडीमुळे मृत्यू
प्राप्त माहितीनुसार या चालकाचे नाव रोहित गौर असे असून त्याने "आपण जे केलं ते योग्य असल्याचे ठाम मत मांडले आहे. रोहितने पोलिसात तक्रार करताना "कवी बाप्पादित्य हे फोनवर कोणाशी तरी बोलताना वेळ आली तर आपण देशाचे शाहीनबाग बनवू" असे म्हणत देश जाळण्याची वार्ता करत होते, माझ्याकडे त्यांचे रेकॉर्डिंग आहे, "ते एक कम्युनिस्ट आहेत आणि हा माणूस माझ्या देशाला जाळण्याच्या गोष्टी करत असताना मी त्याचं का ऐकून घेऊ असा जबाब नोंदवला आहे.
दरम्यान, 23 वर्षीय बप्पादित्य सरकार जुहू येथून आपल्या मित्राच्या घरी कुर्ला येथे जात असतं हा सर्व प्रकार घडला. कवीच्या फोनवरील संभाषण ऐकून चालक रोहित ने आपल्याला एटीएममधून पैसे काढायचे असल्याने थोडा वेळ एका जागी थांबलो तर चालेल का अशी विनंती केली. बप्पादित्य सरकार याने होकार दिला. पण जेव्हा कॅब सांताक्रूझ पोलीस ठाण्याबाहेर थांबली तेव्हा त्याला काहीतरी गडबड सुरु असल्याचं लक्षात आलं आणि पुढे हा सर्व प्रकार घडला.