Businessman Shot Dead: उद्योजकाची गोळी घालून हत्या, वाळूज येथील खळबळजनक घटना, पोलिस तपास सुरु
Waluj Crime PC TWITTER

Businessman Shot Dead: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उद्योजकाचा खूपन केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केली. ही घटना शहरातील वाळूज एमाआडीसी परिसरात घडली आहे. या घटने नंतर शहर हादरले आहे. हल्लेखोर उद्योजकांची हत्या करून घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस कारवाई करत आहे. ( हेही वाचा- शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची निर्घृण हत्या, आरोपींना अटक, सिल्लोड येथील घटना

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथे बालाजी नगर येथे घडली आहे. सचिन साहेबराव नरोडे असं मृत उद्योजकाचे नाव आहे. सचिनचा मृतदेह डोंगराच्या पायथ्याशी निर्जन परिसरात सापडला. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन हा वाळूज परिसरात एक कारखाना चालवत होता. गेल्या काही महिन्यापासून दुकान बंद होते. आरोपी सचिनेच्या ओळखीचे असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यांना मारण्या आधी एकाचा फोन आला होता. त्यांना खवले येथे डोंगरावर भेटण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर एका तासांनंतर त्यांची हत्या केली. गोळी झाडून हत्या केल्यानंतर स्थानिकांना गोळीचा आवाज आला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतला. घटनास्थळावर मृतदेह दिसल्याने स्थानिकांनी पोलिसांना खबर दिली. वाळूज पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी घटनास्थळी आले.या प्रकरणाची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

मृतदेह तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांंनी त्याला मृत घोषित केले. यांच्या डोक्याच्या मागील बाजूस बंदुकीच्या गोळीने जखमा झाल्या आहेत. गंभीर जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.