Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सिल्लोड तालुक्यात घडली आहे. भावाने आणि पुतण्याने विटा आणि दगडाने ठेचून मारहाण केली. या धक्कादायक घटनामुळे सिल्लोड तालुक्यातील भराडी जवळील पिरोळ येथे एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- स्टील व्यावसायिक सज्जन जिंदालला अडकवण्याचा प्रयत्न... मुंबई पोलिसांनी बलात्कार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट केला दाखल)

मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार, जम्मन त्रिंबक गोरे असं हत्या झालेल्या वृध्दाचे नाव आहेत. जम्मन यांचा भाऊ रघुनाथ त्रंबक गोरे आणि पुतण्या कृष्णा रघुनाथ गोरे अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून जम्मन आणि त्यांचा भाऊ रघूनाथ यांच्यामध्ये सामाईक शेतीवरून वाद झाला होता. जम्मन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला आहे. पोलिसांनी या घटनेनंतर आरोपींना अटक केले आहे.

न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. १६ मार्च रोजी शनिवारी ही घटना घडली. जून्या शेतीच्या व घराच्या वादातून त्यांच्या वाद झाला. वाद अगदी टोकाला पोहचला आणि दगडाने ठेचून हत्या केली. गावकऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे, त्यांच्या अनेक दिवसांपासू न वडिलोपार्जित समाईक शेती आणि संपत्तीवर भाडंण सुरु होते. याचा राग मनात धरून त्यांनी हत्या केली. जम्मन हे भराडी येथील घरात राहत होते तर दुसरा भाऊ पिरोळा शिवारातील शेतात राहत होता.

जम्मन यांचा खून झाल्याची माहिती त्यांच्या मुलाला रात्री कळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.