Sajjan Jindal: स्टील व्यावसायिक सज्जन जिंदालला अडकवण्याचा प्रयत्न... मुंबई पोलिसांनी बलात्कार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट केला दाखल
Rape Complaint Against Sajjan Jindal

स्टील व्यावसायिक सज्जन जिंदाल यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी जिंदालवर दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचे समोर आणले आहे. बीकेसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी वांद्रे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. तक्रारदार व्यावसायिकाला खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात समोर आले आहे.  (हेही वाचा - Pune Crime: पुण्यात घरगुती वादातून पतीने पत्नी आणि मुलीला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर)

एका अभिनेत्रीने बीकेसी पोलीस ठाण्यात स्टील व्यावसायिकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. इंडिया टुडेने या प्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या बी सारांश अहवालाची विशेष माहिती मिळवली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, नोंद झालेल्या गुन्ह्याच्या तपासात असे दिसून आले आहे की तक्रारदाराने घटना घडल्यानंतर खूप दिवसांनी तक्रार दाखल केली होती. याशिवाय, असे सांगूनही तक्रारदाराने या प्रकरणात अद्याप कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकवेळा विचारणा करूनही, कथित पीडितेने कोणताही पुरावा सादर केला नाही किंवा सीआरपीसी 164 अंतर्गत तिची जबानी नोंदवली नाही. यात अनेक वेळा न्यायालयाचा वेळही वाया गेला.

तपासात असेही समोर आले आहे की एफआयआरमध्ये तक्रारदाराने आरोप केला होता की, 24 डिसेंबर 2021 रोजी आरोपींनी ताज लँड आणि हॉटेलमध्ये तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हॉटेलची चौकशी आणि तिथल्या साक्षीदारांच्या साक्षीवरूनही आरोपी घटनेच्या कथित तारखेला तिथे गेलाच नव्हता, असाच निष्कर्ष निघाला. एफआयआरमध्ये जे काही नोंदवले आहे, तपासात असे काही घडले नसल्याचे समोर आले आहे.