Pune Crime: पुण्यात  घरगुती वादातून पतीने पत्नी आणि मुलीला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर
हल्ला | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुण्यात कौटुंबिक वादातून हत्या (Murder) केल्याचे प्रकारही सातत्याने समोर येत आहेत. एवढंच नाही तर घरातील वाद विकोपाला जाऊन थेट एकमेकांचा जीव घेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहे.  पुण्याच्या कात्रज परिसराजवळील दत्तनगरमध्ये दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस आलाय. घरगुती वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान खून करणारा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर राहिला.  (हेही वाचा - UP Shocker: अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत कोचिंग सेंटरच्या संचालकाचे प्रेमसंबंध; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर केली हत्या)

श्वेता तळेवाले (वय 40), शिरोली तळेवाले (वय 16) अशी हत्या झालेल्या दोन जणींची नावे आहेत. याप्रकरणी अजय तळेवाले (वय 45) असे आरोपीचे नाव आहे.  गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि अजय यांच्यात वेळोवेळी भांडण होत होते. आर्थिक वादातून त्यांच्यामध्ये भांडणे व्हायची. शुक्रवारी रात्रीदेखील या दोघांमध्ये वाद झाले. त्यावेळी पत्नी श्वेताने रागात माहेरी निघून जाणार असल्याचं पतीला सांगितलं. पती-पत्नीमधील वाद निवळल्यानंतर श्वेता झोपी गेली. त्यानंतर संतापलेल्या पतीने श्वेताच्या हाताची नस कापली त्यानंतर उशीने तिचं तोंड दाबून तिची हत्या केली.

अजय हा फायनान्स एडव्हायजर म्हणून काम करीत होता. पती पुण्याचा तर पत्नी ही मुळची नागपूरची होती त्यासोबतच आर्थिक बाबींवनरुन दोघांमध्ये वाद होत होते. श्वेता यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर श्वेताने अजयसोबत विवाह केला होता. श्वेताला पहिल्या पतीपासून मुलगी होती तर अजय आणि श्वेताला एक मुलगा आहे. त्या दोघांमध्ये अने दिवसांपासून वादावादी सुरु होती.