Bulli Bai App Case मधील आरोपींचा Sulli Deals मध्येही हात; पोलिसांनी दिली Mumbai Court मध्ये माहिती
(Photo Credit - Twitter)

Bulli Bai App Case मधील 3 आरोपींच्या जामीनाला मुंबई पोलिसांच्या सायबर सेल कडून विरोध करण्यात आला आहे. पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीमाहितीनुसार तपासात समोर आलेल्या गोष्टीनुसार या तिन्ही आरोपींचा बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरणासोबतच 'Sulli Deals' अ‍ॅप प्रकरणामध्येही हात आहे. त्यामुळे विशाल कुमार झा, श्वेता सिंग आणि मयांक रावत यांचा जामीन रखडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार Bulli Bai app चा निर्माता Niraj Bishnoi याच्या मदतीने आरोपींनी गुन्हा केला आहे. सध्या Niraj Bishnoi याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

आज (18 जानेवारी) कोर्टामध्ये या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. पोलिसांनी जामिन  नाकरण्यासाठी आपली बाजू मांडताना तिन्ही जण बाहेर पडल्यास पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते किंवा ते पळून जाऊ शकतात.

कोर्टाच्या सुनावणी दरम्यान त्यांनी आपल्या टीम्स दिल्लीला रवाना केल्या असून Niraj Bishnoi, Omkareshwar Thakur या सुली डिल्स आणि बुल्ली बाई अ‍ॅपच्या निर्मात्यांचा ताबा घेण्याच्या तयारीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडीयावर अ‍ॅक्टिव्ह आहेत आणि त्यांनी केलेल्या पोस्टमुळे समाजात शांततेचा भंग होऊ शकतो. Niraj Bishnoi हा 20 वर्षीय तरूण असून तो बी टेकचा विद्यार्थी आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO team ने त्याला Bulli Bai case मध्ये अटक केली आहे.

मुंबईच्या वांद्रे कोर्टने बुल्ली बाई अ‍ॅप केस मधील सहआरोपी श्वेता सिंग, मयांक रावत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे ती 28 जानेवारी पर्यंत आहे. यापूर्वी ते 14 जानेवारी पर्यंत Mumbai Cyber Cell police custody मध्ये होते. 5 जानेवारीला त्यांना उत्तराखंड मधून अटक करण्यात आली होती तर विशाल कुमार झा ला 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.