बुलडाणा : वादळी वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळले, आईसह दोन लहानग्यांचा दुर्देवी मृत्यू
Image For Representation (Photo Credits: File Image)

बुलडाणा  (Buldhana) लगतच्या परिसरात शनिवारी रात्री वादळी वारीसोबत मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या.खरतर मोठ्या प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने सर्वत्र आनंद साजरा केला जात होता मात्र खामगाव (Khamgaon) तालुक्यातील घाटपुरी (Ghatpuri) येथे कालपासून शोककळा पसरली आहे. या ठिकाणच्या एका घरावर झाड कोसळल्याने घरातील एक महिला व तिच्या दोन लहानग्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व शेजारील नागरिकांनी तिथे जाऊन क्रेनच्या मदतीने झाड उचलले, मात्र तोपर्यंत घरातील तिघांचा झाडाच्याखाली दबून अंत झाला होता. कोल्हापूर, औरंगाबाद, यवतमाळ वाशिम जिल्ह्यांसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी

घाटपुरी येथील आनंदनगर मध्ये हिरडकर नामक कुटुंबीय एका पत्र्याच्या घरात राहत होते. शनिवारी पाऊस सुरु होताच वादळी वाऱ्यांमुळे घराशेजारच्या लिंबाचे झाड छप्परावर पडले. यावेळी गुणवंत हिरडकर हे घरातील प्रमुख आपल्या कामावर गेले होते व घरात आई शारदा हिरडकर (वय 28), मुलगी सृस्ष्टी हिरडकर (वय 3  वर्षे) व मुलगा ऋषिकेश हिरडकर ( वय 2 वर्षे) हे तिघेच उपस्थित होते. हे झाड अचानक पडल्याने त्यांना घरातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही. अकोला : वीज कोसळल्याने मोबाइलवर बोलणाऱ्या युवकाचा मृत्यू

याबाबत माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली मात्र तोपर्यंत बरच उशीर झाला होता. मग पोलिसांना बोलवून क्रेनच्या मदतीने हे झाड उचलण्यात आले. त्यानंतर झाडाखाली दबलेल्या या मायलेकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.