Beat Representative Image (फाईल फोटो)

रात्रीच्या सुमारास प्रेयसीच्या घरात घुसल्याने तिच्या नातेवाईकांनी प्रियकराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात प्रियकराला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना बुलढाणा (Buldhana) जिल्हातील संग्रापूर (Sangrapur) तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांपैकी दोघांना अटक करण्यात आली असून 6 आरोपी फरार झाले आहेत. हा प्रकार प्रेम प्रकरणातू घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.

ज्ञानेश्वर घिवे असे मृताचे नाव असून तो संग्रामपूर तालुक्यातील सावळा गावात राहत होता. ज्ञानेश्वर याचे गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रभाकर धूळ याच्या मुलीसोबत प्रेम संबध होते. यामुळे ज्ञानेश्वर प्रेयसीला भेटण्यासाठी बुधवारी रात्री तिच्या घरात घुसला. ज्ञानेश्वर हा प्रेयसीच्या घरात घुसल्याचे आरोपीने पाहिले आणि त्याला घरातून बाहेर काढत कुऱ्हाडीचे दांड्याने आणि काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा- पुणे: Child Pornography चे व्हिडीओ अपलोड करणाऱ्या तिघांना अटक; खडक पोलिसांची कारवाई

मृतक ज्ञानेश्वर यांच्या विडलांनी केलेल्या तक्रारीवरुन आरोपी प्रभाकर धुळ, गजानन धुळ, अजाबराव धुळ, गणेश धुळ, प्रकाश धुळ, रामराव धुळ, विठ्ठल धुळ आणि ज्ञानेश्वर धुळ या 8 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.