सण समारंभांचा काळ सुरू आहे. अशामध्ये आता Mumbai Milk Producers Association कडून म्हशीच्या दुधाच्या किंमतींमध्ये वाढ (Buffalo Milk Price Hike) जाहीर केली आहे. 1 सप्टेंबर पासून ताज्या म्हशीच्या दुधाचे दर दोन रूपयांनी वाढणार आहेत. MMPA च्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये हा दूध दरवाढीचा निर्णय एकमताने झाला आहे. त्यामुळे आता अन्य दूधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीची देखील शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गणपतींचं आगमन होणार आहे. त्यापाठोपाठ नवरात्र, दसरा, दिवाळी असणार आहे.
MMPA च्या Executive Committee member C.K. Singh यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हशीच्या दुधाची किंमत आता रिटेलर्स मध्ये 87 रूपयांवरून 89 रूपये होणार आहे. पुढील सहा महिने हे दर कायम राहतील. नंतर MMPA किंमतींचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेईल. तर होलसेल मध्ये म्हशीच्या दूधाचे दर 93 ते 98 रूपये प्रति लीटर पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूधाचा वापर केला जातो. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मिठाईसाठी फटका बसण्याचा अंदाज आहे.
मुंबई दररोज 50 लाख लिटर पेक्षा अधिक म्हशीच्या दुधाचा वापर केला जातो. त्यापैकी 700,000 लीटरहून अधिक MMPA द्वारे दुग्धशाळा, शेजारील किरकोळ विक्रेते आणि शहराच्या आसपास पसरलेल्या शेतात पुरवठा केला जातो. सर्व गाय आणि म्हशी दूध उत्पादक संघटना आणि ब्रँडेड कंपन्यांनी लोकसभा निवडणुकीमुळे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये नियमित दरवाढ टाळली होती.
महाराष्ट्रातील काही घाऊक विक्रेते आणि गाईच्या दुधाच्या प्रमुख ब्रँडेड उत्पादकांनी दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ केली होती. आता MMPA द्वारे आगामी दरवाढीमुळे, ते पुढील महिन्यापासून देशांतर्गत Domestic Finances वर आणखी ताण टाकून त्यांच्याप्रमाणेच दरवाढ करण्याचा अंदाज आहे.