अनिल महाजन यांची बसपाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये घरवापसी; संघटन कौशल्याचा पक्षाला होऊ शकतो फायदा
Anil Mahajan joins BJP

बहुजन समाज पार्टी (BSP) महासचिव तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन (Anil Mahajan) यांनी भाजप (BJP) प्रवेश केला. राज्याचे जलसंपदामंत्री आणि भाजपचे महत्त्वाचे नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांचे मुंबईतील निवासस्थान 'शिवनेरी' येथे हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी व्ही सतीश राष्ट्रीय सह संघटन मंत्री, आमदार प्रसाद लाड यांच्यासह महाजन यांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसी बहुजन नेते म्हणुन अनिल महाजन यांची राज्यभर ओळख आहे. माळी समाज संघटनात राज्यभरातुन महाजन यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातुन अनेक ठिकाणी मेळावे ,बैठका,शिबीर घेउन ओबीसी-बहुजन समाजाला एकत्र करण्याचे काम त्यांनी केले आहे. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत अनिल महाजन यांनी आपल्या कामाच्या माध्यमातुन एक वेगळी ओळख तयार केली आहे. मदतीला धावुन येणारा नेता म्हणुनही महाजन यांच्याकडे पाहिले जाते.

राज्यातल्या अनेक मतदार संघात माळी व ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे.अतिशय उत्तम संघटन कौशल्य अनिल महाजन यांच्याकडे असल्यामुळे पुन्हा भाजपात त्यांची घरवापसी झाली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत अनिल महाजन यांचा संघटन कौशल्याचा राज्यपातळीवर भाजपाला नक्कीच फायदा होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.