Stock Market | (Image Used For Representational Purpose) | PC: Pixabay.com

देशातील अग्रगण्य स्टॉक एक्स्चेंज मुंबई शेअर बाजार (BSE ) आणि नाशिक सराफा असोसिएशन (Nashik Sarafa Association) आता एकत्र काम करणार आहेत. कमोडिटी (Commodities Market) आणि डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट (Derivatives Market) विकसित करण्यासाठी दोन्ही संस्थांनी परस्परांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसईने ही माहिती दिली. बीएसईने अधिक माहिती देताना एका निवेदनात सांगितले की, दोन्ही संस्था सराफा कमोडिटी करारावर नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील. कमोडिटीज आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटबाबत त्याच्या भागधारकांमध्‍ये समज वाढवण्‍याचा, त्‍यांना त्‍यांच्‍या फायद्यांबद्दल शिक्षित करण्‍याचा आणि देवाण-घेवाणीवर विचार आणि गुंतवणूक करण्‍यास प्रोत्‍साहन देण्‍याचा या कराराचा उद्देश आहे.

नाशिक ज्वेलर्स असोसिएशचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी सांगितले की, आम्ही बीएसईच्या माध्यमातून सोन्याच्या हेजिंगसारख्या विषयांवर ज्ञानपूर्ण माहिती मिळवत राहू. जेणेकरून आमचा व्यवसाय अधिक सुरक्षीत आणि आर्थिकदृष्ट्या सुरळीतपणे पुढे चालू ठेवता येईल. त्यासाठीच या दोन्ही संस्थांनी परस्परांसोबत सामंजस्य करार केला आहे. (हेही वाचा, Stock Market News: कधी येणार LIC IPO? घ्या जाणून)

ट्विट

बीएसईचे सीबीओ समीर पाटील यांनी म्हटले की, या दोन संस्थांच्या सामंजस्य कराराद्वारे (Memorandum of Understanding), बीएसई आणि नाशिक सराफा असोसिएशन एकत्रितपणे कमोडिटी इकोसिस्टममधील व्हॅल्यू चेन सहभागींच्या वाढीसाठी आणि विकसित करण्यासाठी सहकार्य करतील. जेणेकरुन त्यांना स्पर्धेला सामोरे जाताना किंमत आणि जोखीम अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करता येईल. आम्ही दोन्ही पक्षांची सामर्थ्य, संसाधने, अनुभव आणि कौशल्ये एकत्र आणून विद्यमान कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केट विकसित करण्यात एकमेकांना मदत करू असे ही ते पुढे म्हणाले.