Stock Market News: कधी येणार LIC IPO? घ्या जाणून
LIC | (File Photo)

भारतीय जीवन विमा निगम Life Insurance Corporation) अर्थातच एलआयसी (LIC) आपला मेगा आयपीओ (LIC IPO) लवकरच घेऊन येत आहे. हा आयपीओ या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देऊन दिलेल्या वृत्तात आयएनएसने ही माहिती दिली आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन विभाग (DIPAM) सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले की, या आयपीओबाबत योजना पूर्ण झाली आहे.

तुहिन कांता पांडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एलआयसी आयपीओच्या व्यवहार्यतेसंदर्भात प्रसारमाध्यमांतून येणारी वृत्ते आणि लावले जाणारे तर्क यांमध्ये तथ्य नाही. आम्ही पुन्हा एकदा हे सांगतो आहोत की, या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीपर्यंत आयपीओ आणण्याचा विचार सुरु आहे. हा आयपीओ भारतात सर्वाधिक खरेदी केला जाण्याची शक्यता आहे. या आयपीओच्या माध्यमातून केंद्र सरकारला एक लाख कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज आहे. (हेही वाचा, Mutual Fund Investment: विदेशी कंपन्यांच्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावी काय? घ्या जाणून)

एलआयसी एक वैधानिक निगम आहे. ज्याची स्थापना एलआयसी कायदा 1956 अंतर्गत करण्यात आली होती. हा देशातील जीवन विमा क्षेत्राताल सर्वात मोठी कंपनी आहे. जी पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची (अजूनतरी) आहे. या कंपनीच्या भारताबाहेर तीन शाखा आहेत. यात इंग्लंड, फिजी आणि मॉरिीशस या ठिकाणी या तीन शाखा आहेत. याशिवाय सिंगापूर येथे पूर्ण मालकी असलेली सहाय्यक गुंतवणूक, बहरीन, केनिया, श्रीलंका, नेपाळ, सऊदी अरब आणि बांग्लादेश आदी ठिकाणी संयुक्त उपक्रम आहेत. भारतात याच्या सहाय्यक कंपन्यांमध्ये एलआयसी पेन्शन फंड लिमिटेड आणि एलआयसी कार्ड सर्विसेज लिमिटीड आहेत. या कंपन्यांच्या सहकारी कंपन्या आयडीबीआय, एलआयसी म्युच्युअल फंड आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्सेस यांचा समावेश आहे.