Mumbai Crime: दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीची निर्घृण हत्या, बंद खोलीत सापडला मृतदेह, आरोपी पतीला अटक
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Mumbai Crime: मुंबई (Mumbai) शहरातील कांजूरमार्ग येथे एका पतीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक (Arrest) केली आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले आणि सहा महिन्यांपूर्वी दोघांनी एकमेकाशी लग्न केले. राजेश यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दीपा यादव असं हत्या झालेल्या महिलेचे नावा आहे.( हेही वाचा- पतंग उडवताना टेरेसवरून पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू; मीरा रोड येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कांगूर मार्गावर असलेल्या झोपडपट्टीतून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले, दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी दार तोडलं आणि महिला बेशुद्द बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत सापडली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावरून हल्लेखोर फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी राजेशची चौकशी सुरु केली. राजेश फरार असल्याने पोलिसांनी त्याच्यावर संशय घेतला.

त्यानंतर त्याचा फोन नंबर शेजारच्या कडून घेऊन त्याचा लोकेशन ट्रेस करण्यात आलं. उत्तर प्रदेशाच्या गाझीपूर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी राजेशची चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याचे कबुल केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी राजेशवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दारू पिण्यावरून भांडण आणि विरोध केल्याने तिची हत्य करण्यात आली असा गुन्हा कबुल केला.