Heart Attack | (Photo credits: Pixabay)

मुलीचा हात आयुष्याभरासाठी तिच्या नवर्‍याचा हातात सोपावणं हा क्षण कोणत्याही पित्यासाठी मोलाचा असतो. पण जामनेर (Jamner) मधील मांडवे बुद्रुक (Mandve Budruk)  मध्ये एका पित्याचा या मोलाच्या काही क्षण आधीच मृत्यू झाला. मुलीच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वी वधुपित्याचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. हृद्यविकाराच्या झटक्याने वधुपित्याचं निधन झाले आहे.

अरूण कासम तडवी असं या वधूपित्याचं नाव आहे. मुलीच्या लग्नाआधी त्यांच्याकडे हळदीचा कार्यक्रम सुरू होता. हळदीमध्ये नाचताना अरूण यांचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या काही तास आधी मृत्यू झाल्याने ऐन लग्न घरात दु:खाचा डोंगर कोसळला होता. नक्की वाचा: COVID 19 होऊन गेलेल्यांनी हृद्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं; तरूणांमधील वाढत्या Cardiac Arrest च्या घटनांवर पहा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला काय?

कोविड 19 संकटानंतर आता हृद्यविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पूर्वी हार्ट अटॅक हा केवळ व्यसनाधीनांना होणारा आजार किंवा वयोवृद्धांमध्ये होणारा आजार होता पण आता तरूणांनाही हार्ट अटॅकच्या विळख्यात घेतलं आहे. कार्डिएक अरेस्टचंही प्रमाण वाढलं आहे. या आजारात चालता बोलता व्यक्तीचा मृत्यू होतो.