Aurangabad: श्रद्धा हत्याकांडामुळे देशात संतापाचे वातावरण आहे. अशातचं आता औरंगाबादमध्ये (Aurangabad) प्रेमी युगलांसंबंधीत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने स्वत: ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रेमी युगलांवर शासकीय रुग्णालय घाटीमध्ये उपचार सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रियकराने स्वत:ला पेटवून प्रेयसीला मिठी मारल्याने या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. गजानन मुंडे आणि पूजा साळवे असं या प्रेमीयुगुलाचं नाव आहे. दोघे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागातील संशोधक विद्यार्थी आहेत. (हेही वाचा - Jalgaon: झोक्यावर बसून अभ्यास करणं 14 वर्षांच्या चिमुरड्याला पडलं माहागात; झोका खेळतांना लागला गळफास)
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी संस्थेत प्रोजेक्ट करत होती. यावेळी हा तरुण कार्यालयात आला. त्याने पीडिता बसलेल्या खोलीचा दरवाजा लावला आणि त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतलं. तरुणाच्या शरीराने पेट घेतल्यानंतर त्याने तरुणीला मिठी मारली. या घटनेत दोघेंही गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, पीडितेने तरुणास लग्नाला नकार दिल्यामुळे हा तरुणाने हे पाऊल उचलले.