मुंबईतील वांद्रे परिसरातील एका क्लबमध्ये (Mumbai Club) काल रात्री बाउन्सर आणि ग्राहकांमध्ये हाणामारी झाली. क्लबच्या लिफ्टमध्ये हाणामारी (Fight) सुरू झाली. तेथे उपस्थित इतरांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लबचे बाउन्सर आणि ग्राहक लिफ्टमध्ये एकमेकांवर किक-पंच मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. डीसीपी बांद्रा कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले की, काल रात्री 1 च्या सुमारास या संपूर्ण घटनेची काही माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांचे पथक क्लबमध्ये पोहोचले. काही मुलांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी सुरू झाली. याप्रकरणी सध्या 7 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पहा व्हिडिओ
Look what happened yesterday night at Bandra’s Escobar. Customers beaten by pub bouncer and staffs. #bandra #mumbai #nightlife #mumbaipolice #pub pic.twitter.com/CrC7Qzg8Zs
— Preeti Sompura (@sompura_preeti) June 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)