Property Dispute | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नवरा बायको आणि तिचा प्रियकर (Husband, Wife and His Lover) अशा कहाण्या आपण अनेकदा ऐकतो. पण, मुंबईतील बोरिवली (Borivali) येथे काहिसा पत्नी, पती आणि त्याची प्रेयसी असा वाद (Property Dispute) रंगला. या वादात पत्नी असलेल्या 59 वर्षीय रहिवासी शर्ली फेल्सीडा यांना प्रदीर्घ काळ न्यायालयीन लढा लढावा लागला. अखेर त्यांनी हा लढा जिंकला आहे. पतीने प्रेयसीला दिलेला फ्लॅट (Real Estate) न्यायालयाच्या निर्णयामुळे फेल्सीडा यांना परत मिळाला आहे. मात्र, त्यासाठी त्यांना न्यायालयीन लढाई (Mumbai Court) मोठ्या संयमाने लढावी लागली. कोर्टाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या पतीच्या प्रियकराकडून फ्लॅट त्यांना परत मिळवून दिला आहे. शहर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले की, ज्युली डिसिल्वा या महिलेचा सदर मालमत्तेवर कोणताही हक्क नाही. ज्युली डिसिल्वा या शर्ली फेल्सीडा यांच्या पतीच्या कथीत प्रेयसी होत्या. पतीने त्यांना तो फ्लॅट दिला होता.

काय आहे प्रकरण?

शर्ली फेल्सिडा यांनी 17 एप्रिल 2009 रोजी ज्युली डिसिल्वा विरुद्ध दावा दाखल केला आणि तिला कायदेशीर कारवाईद्वारे  फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले. शर्लीने दुबईत काम करताना कष्टाने कमावलेले पैसे वापरून 28 डिसेंबर 1986 रोजी 1.43 लाख रुपयांना बोरीवली येथे फ्लॅट खरेदी केला होता. जो त्यांच्या पतीने त्याची कथीत प्रेययसी ज्युली हिस दिला होता. (हेही वाचा, Man Kills Wife for Medical Bills: वैद्यकीय खर्च भरण्यात अपयश, पतीने रुग्णालयातच घोटला पत्नीचा गळा)

विवाह आणि सुरुवातीचे जीवन

शर्ली फेल्सिडा यांनी 19 डिसेंबर 1971 रोजी जेराल्ड डेनिस सुमित्रासोबत विवाह केला. या विवाहातून त्यांना शेरॉन नावाची मुलगी झाली. जेराल्ड याला दारुचे व्यसन होते. तो कधीही नोकरी अथवा व्यवसाय करु शकला नाही. दरम्यान, 1979 मध्ये, शर्लीला दुबईत नोकरी मिळाली आणि कुटुंब तिकडे स्थायिक झाले. जे डिसेंबर 1994 मध्ये भारतात परतले. (हेही वाचा, Rajasthan Horror: कुटुंबातील पुरुषांसह नातेवाईकांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर जबरदस्ती; पतीची विकृत मानिसकता)

मालमत्ता खरेदी आणि व्यवस्थापन

दुबईत असताना, शर्लीने तिची बहीण डोरिस फ्रान्सिस यांच्यामार्फत मुंबईतील तिची मालमत्ता व्यवस्थापित केली. जिने तिचे वकील म्हणूनही काम केले. दरम्यान, 1992 ते 1999 पर्यंत, फ्लॅट लॉक होण्यापूर्वी विविध पक्षांना रजा आणि परवाना तत्त्वावर भाड्याने देण्यात आला होता. याच काळात शर्ली यांना त्यांचा पती जेराल्ड हा ज्युली डिसिल्वासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे 2008 मध्ये आढळले. ज्युली, जी विवाहित होती, ती अनेकदा फ्लॅटमध्ये रात्रभर राहायची आणि जेराल्डची कायदेशीररित्या विवाहित पत्नी म्हणून वावरत असे. फ्लॅट विकण्याचाही या जोडप्याचा मानस होता, असा शर्लील यांचा दावा होता.

कायदेशीर कारवाई

फ्लॅटची विल्हेवाट रोखण्यासाठी, शर्लीने गृहनिर्माण संस्थेला कळवले की जेराल्ड किंवा ज्युली दोघांनाही तिच्या संमतीशिवाय फ्लॅट विकण्याची परवानगी देऊ नये. ऑक्टोबर 2008 मध्ये जेराल्डचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि त्याच दिवशी ज्युलीने फ्लॅटचा ताबा घेतला. ज्युलीने जेराल्डकडून तिला फ्लॅटचे मृत्यूपत्र आणि तिची पत्नी म्हणून नामांकन फॉर्म असल्याचा दावा केला.

न्यायालयाचा निर्णय

शर्लीने ज्युलीला फ्लॅट रिकामा करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली, पण ज्युलीने नकार दिला. अनेक वेळा कायदेशीर नोटीस बजावूनसुद्धा ज्युली या खटल्याला प्रतिसाद देण्यात अयशस्वी ठरली. त्यानंतर कोर्टाने शर्लीच्या बाजूने निर्णय दिला. निकालात असे नमूद केले की जेराल्डला सदनिका मृत्यूपत्र करण्याचा किंवा ज्युलीला सोसायटी रेकॉर्डमध्ये पत्नी म्हणून नामांकित करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. कोर्टाने पुढे असेही म्हटले की, जेव्हा मृत डेनिसला फ्लॅटमध्ये कोणतेही कायदेशीर अधिकार, शीर्षक किंवा स्वारस्य नव्हते, तेव्हा त्याला सूट फ्लॅटच्या संदर्भात सोसायटीला नामनिर्देशन फॉर्म जारी करण्याचा कायदेशीर अधिकार नव्हता. तसेच मृत्यूपत्र पूर्ण करण्यासाठी त्याला कायदेशीररित्या अधिकृत देखील केले नव्हते. प्रतिवादीच्या बाजूने उक्त सूट फ्लॅटच्या संदर्भात दाखल अर्जाविरधात प्रतिवादी तथाकथित इच्छापत्र तिच्या बाजूने सिद्ध करण्यासाठी पुढे आला नाही. त्या इच्छापत्राची चौकशी करण्यात आली हे दर्शविण्यासाठी रेकॉर्डवर काहीही नाही,” असे न्यायालयाने म्हटले. सर्व साक्षी पुरावे पाहून कोर्टाने सदर फ्लॅट पत्नी असलेल्या शर्ली हिस दिला.