Building | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

दक्षिण  मुंबई म्हणेजे मुंबईचं काळीज. प्रत्येकालाचं मुंबईच्या मनात राहायचं आहे पण दक्षिण मुंबई राहायचं म्हणटल्यावर घराचे भाव गगनाला भिडलेले. आयुष्याची सगळी कमाई लावली तरी सर्वासामान्यांना दक्षिण मुंबईत घर घेण अश्यक्यचं. पण मुंबईतील दक्षिण मुंबई भागाताचं मुंबईतील सर्वाधिक उच्च इमारती आहेत. तसेच महत्वाची शायकीय ठिकाणे म्हणजेचं मंत्रालय, मुंबई महापालिका, रिजर्व बॅक ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी विविध शासकिय कार्यालये या भागात असल्याने या भागात अतीसंवेदनशील मानलं जात. दक्षिण मुंबईतील कुठल्याही भागात कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायचं असल्यास परवागी घेणं अनिवार्य आहे. अशीच एका बांधकाम विकासाला माझंगाव डॉकयार्ड परिसरात बांधकाम करण्यास बीएमसीकडून परवानगी देण्यात आली.

 

इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली पण सात मजले बांधकाम पुर्ण झाल्यानंतर महापालिकेने 2018 मध्ये काम थांबवण्याची नोटीस बजावली, तरीही विकसकानं 29 मजल्यापर्यंत बांधकाम केलं. याचप्रकरणी विकासकानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वपुर्ण निर्देश देण्यात आले आहेत. माझंगाव डॉक परिसर हा ति संवेदनशील परिसर आहे, या परिसरात एवढी उच्च इमारत असल्यास  या इमारतीचा हेरगिरीसाठी वापर होवू शकतो. त्यामुळे या परिसरात उंच इमारतींना परवानगी देता येणार नाही,असं मुंबई न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. (हे ही वाचा:- Mumbai Weather Report: मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्य सरकारवर टीकास्त्र; प्रदूषणाचे स्रोत शोधून कारवाईची मागणी)

 

तसेच, नागरिकांच्या वैयक्तिक हक्कापेक्षा देशाची सुरक्षा अधिक महत्त्वाची असल्याचं मतही न्यायालयानं यावेळी नोंदवलं आहे. तरी या जागेवर केवळ चार मजली इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेचं २९ मजले चढवलेले या इमारतीच्या विकासकाचं संकटही आता गगनाला भिडलं आहे.