देशातील सर्वाधिक वायुप्रदुषण असलेले शहर अशी राजधानी दिल्लीची ओळख होती. अशीच ओळख आता आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai Pollution) शहराचीही होऊ लागली आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) संस्थेने मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता (AQI Of Mumbai) नुकतीच नोंदवली. या नोंदीनुसार मुंबईतील बिकेसी (BKC) परिसरातील हवेची गुणवत्ता AQI 310 इतकी (रविवारी, 11 डिसेंबर) सकाळी 11.35 वाजता) होती. जी सर्वात वाईट समजली जाते. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता घसरल्याचे आणि ती धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे पुढे येताच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोबतच प्रदूषणाचे स्रोत शोधून कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे.
हवेची गुणवत्ता मोजण्याचे परिमान
201 ते 300 मधील AQI- खराब श्रेणीत मानला जातो
301-400 मधील AQI- अत्यंत खराब श्रेणीत मानला जातो
401-500मधील AQI- गंभीर श्रेणीत मानला जातो
हवेची गुणत्ता चांगली कधी?
शून्य आणि 50 मधील AQI- चांगला या श्रेणीत मानला जातो
51 आणि 100 मधील AQI- समाधानकारक या श्रेणीत मानला जातो
101 आणि 200 मधील AQI- मध्यम- या श्रेणीत मानला जातो
ट्विट
Maharashtra govt silent on Mumbai pollution. The source of pollution must be traced and proper steps need to be taken, but Shinde govt is least bothered: Aaditya Thackeray, Uddhav-Shiv Sena leader pic.twitter.com/OGjLvNK9TQ
— ANI (@ANI) December 11, 2022
ट्विट
मुंबई: सिस्टम ऑफ एयर क्वालिटी एंड वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्च (SAFAR) के अनुसार BKC में AQI 310 (बहुत खराब) श्रेणी में है। pic.twitter.com/boSeJwfK1R
— ANI_HindiNews (@AHindinews) December 12, 2022
दरम्यान, SAFAR डॅशबोर्डने रविवारी वरळीचा AQI 100 आणि BKC चा AQI 312 दर्शविला. बोरिवलीचा AQI 90 वर 'समाधानकारक' श्रेणीत राहिला. माझगावचा AQI आणि चेंबूरचा AQI 'अत्यंत खराब' श्रेणीत दर्शवला. जो 336 चे 319 दरम्यान होता. (हेही वाचा, Mumbai Air Quality: मुंबई शहराची हवेची गुणवत्ता कमालीची घसरली, अनेक मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला परिणाम)
ट्विट
Maharashtra | Air quality in the 'Poor' category in Mumbai, as per System of Air Quality and Weather Forecasting And Research (SAFAR)-India. pic.twitter.com/rH8W3wV9Ie
— ANI (@ANI) December 12, 2022
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही पाऊल न उचलल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर टीका केली. "मुंबईच्या प्रदूषणावर महाराष्ट्र सरकार गप्प आहे. प्रदूषणाचे स्रोत शोधून त्यावर योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे, पण विद्यमान सरकारला जनतेच्या आरोग्याबद्दल काहीच पडली नाही," असे आदित्य ठाकरे यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले.