Image For Representation (Photo Credits: Twitter)

आज, शनिवार, 14 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया (Gate Way Of India) हुन तब्बल 88 प्रवाशांना घेऊन निघालेली एक बोट अलिबाग (Alibaug) जवळ मांडवा जेट्टीपासून (Mandwa Jetty) काही अंतरावर बुडाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व 88 प्रवासी हे सुखरूप आहेत. अजंठा कंपनीच्या मालकीची ही बोट असून, जेट्टीजवळ पोहचण्याच्या अवघ्या एक किमी आधी ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजत आहे. बोट बुडत असल्याचे दिसताच जवळच असलेल्या पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटने 80 प्रवाशांना बाहेर काढले आणि त्वरित जेट्टीवर पोहचवले तसेच उर्वरित 8 ज्यांना स्पीड बोटच्या सहाय्याने किनर्यार पोहचवण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी साध्य सुखरूप आहेत. मुंबई: वरळी मध्ये भरधाव BMW च्या भीषण अपघातात 3 ठार तर 1 जखमी, मृतांमध्ये 6 महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश

प्राप्त माहितीनुसार, अजंठा कंपनीची बोट ही लाकडी असून याचे प्रवासी क्षमता केवळ 50 ते 60 इतकीच आहे. मात्र यावेळी बोटीत 88  जण प्रवास करत होते, साहजिकच अतिरिक्त भार आल्याने बोट मांडवी जेट्टीजवळ पोहचत असतानाच त्यात बिघाड झाला आणि हळूहळू पाणी बोटीत शिरूलागले . यामुळे सर्व प्रवासी घाबरून जोरजोरात ओरडू लागले होते. याबाबत मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना माहिती मिळताच त्यांनी सद्गुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यास तातडीने पाठवून दिले. अजंठा या बोटसेवा देणाऱ्या कंपनीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मराज सोनके यांनी सांगितले.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधून मुंबईत नोकरी किंवा भ्रमंती साठी अनेक जण येत असतात, मुंबईकर सुद्धा पिकनिक ला जाताना अलिबाग या जवळच्या स्पॉटला आवर्जून पसंती दर्शवतात, शनिवार रविवारी या प्रवाशांची संख्या जास्त असते. रेल्वे किंवा बस पेक्षा सागरी मार्गने प्रवास स्वस्त आणि कमी वेळात होत असल्याने अनेक प्रवासी नबोटीच्या प्रवासाला पसंती देतात.