मुंबईतील वरळी (Worli) परिसरात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात गाडी चालविणा-या महिला वाहनचालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडर आदळली. या अपघातात गाडीतील तिघांचा मृत्यू झाला असून गाडी चालविणारी महिला गंभीर जखमी झाली आहे. मृतांमध्ये 2 वृद्ध महिला आणि एका 6 महिन्यांच्या चिमुरडीचा समावेश आहे. जखमी महिलेचे नाव नमिता चंद असे असून त्यांना उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा अपघात इतका भीषण होता की, अपघातातील BMW कार रस्त्यावरील डिव्हायडरला आदळली. ज्याच्या धडकेत या कारमधील 2 वृद्ध महिला आणि 6 महिन्यांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच गाडी चालवणारी जखमी झाली असून तिला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृतीही गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
ANI चे ट्विट:
Mumbai: Three dead, one injured after a speeding car rammed into a divider in Worli area, yesterday. Police says, "the woman who was driving the car has been admitted in the Intensive Care Unit (ICU) of a hospital & she is serious. Further investigation is underway." #Maharashtra pic.twitter.com/EO7jfyKFhs
— ANI (@ANI) March 14, 2020
हेदेखील वाचा- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू
या अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला त्यात नमिता यांची सहा महिन्यांची मुलगी, ७० वर्षीय आई व ६२ वर्षीय नातेवाईक यांचा समावेश आहे.
वरळीतील मेला रेस्टॉरंट जंक्शनजवळ हा अपघात झाला. हा अपघाताचे भीषण स्वरुप पाहता यात BMW कारचा संपूर्ण चुराडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.