BMC Standing Committee Election: मुंबई महापालिकेत शिवसेनेची ताकद वाढली? स्टँडींग कमिटी निवडणुकीत  NCP, सपाचा पाठिंबा, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
BMC | (Photo Credits: Facebook)

मुंबई महापालिका स्थाई समिती (BMC Standing Committee) निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) पुन्हा एकदा शक्तिनमान बनताना दिसते आहे. पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत (Standing Committee Election) राष्ट्रवादी काँग्रेसने आणि समाजवादी पक्षाने आपला उमेदवार न उभा करता शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे. परंतू, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काँग्रेस आपला अर्ज मागे घेऊन शिवसेनेला पाठींबा देईल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. भाजपला रोखण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकासआघाडी पॅटर्न कामी येताना दिसतो आहे.

वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेकडून मैदानात उतरवलेले चेहरे

  • यशवंत जाधव- स्थायी समिती (अध्यक्षपदासाठी)
  • संध्या दोषी- शिक्षण समिती (अध्यक्षपदासाठी)
  • सदा परब- सुधार समिती (अध्यक्षपदासाठी)
  • बेस्ट समिती- आशिष चेंबुरकर
  • यशवंत जाधव - स्थायी समिती (अध्यक्षपदासाठी)

(हेही वाचा, Shiv Sena Spokespersons: शिवसेना प्रवक्त्यांची नावे जाहीर, संजय राऊत, अरविंद सावंत मुख्य प्रवक्ते, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, सचिन अहीर यांच्याकडेही जबाबदारी)

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 92, भाजप – 82, काँग्रेस – 30, राष्ट्रवादी काँग्रेस – 9, समाजवादी पक्ष– 6, एमआयएम – 2, मनसे – 1, अभासे – 1

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, ग्रामपंचायती, पोटनिवडणुका, सहकारी संस्थांच्या निवडणुका यांमध्ये अनेक ठिकाणी महाविकासआघाडी पॅटर्न पाहायला मिळाला आहे. हा पॅटर्न बऱ्याच ठिकाणी यशस्वी झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे या पुढेही हा पॅटर्न असाच राबवला जाणार का याबाबत उत्सुकता आहे.