Shiv Sena Spokespersons: शिवसेना प्रवक्त्यांची नावे जाहीर, संजय राऊत, अरविंद सावंत मुख्य प्रवक्ते, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, सचिन अहीर यांच्याकडेही जबाबदारी
Sanjay Raut, Arvind Sawant | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेनेने आपल्या प्रवक्त्यांची ( Shiv Sena Spokespersons) यादी जाहीर केली आहे. शिवसेना (Shiv Sena) मध्यवर्थी कार्यालयातून निघालेल्या पत्रकात याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि लोकसभा खास अरविंद सावंत (Arvind Sawant) हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत. शिवसेनेने मुख्य प्रवक्त्यांसोबतच इतरही प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यात मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रातील विविध विभागांना संधी दिल्याचे पाहायला मिळते.

शिवसेना प्रवक्त्यांची यादी

 1. खासदार संजय राऊत - मुख्य प्रवक्ते
 2. खासदार अरविंद सावंत- मुख्य प्रवक्ते
 3. खासदार प्रियंका चतुर्वेदी- प्रवक्ते
 4. परिवहन मंत्री अनिल परब- प्रवक्ते
 5. उपनेते सचिन अहिर- प्रवक्ते
 6. आमदार सुनील प्रभू- प्रवक्ते
 7. आमदार प्रताप सरनाईक- प्रवक्ते
 8. आमदार भास्कर जाधव- प्रवक्ते
 9. आमदार अंबादास दानवे- प्रवक्ते
 10. मनीषा कायंदे- प्रवक्ते
 11. महापौर किशोरी पेडणेकर- प्रवक्ते
 12. नगरसेविका शितल म्हात्रे- प्रवक्ते
 13. डॉ. शुभा राऊळ- प्रवक्ते
 14. कोशोर कान्हेरे- प्रवक्ते
 15. संजना घाडी- प्रवक्ते
 16. आनंद दुबे - प्रवक्ते

पक्षाची भूमिका मांडण्याचे काम प्रवक्ते करत असतात. कोणत्याही पक्षाच्या प्रवक्त्याने पक्षाच्या बाबतीत केलेल विधान हे पक्षाची अधिकृत भूमिका म्हणून पाहिले जाते. प्रामुख्याने अनेक महत्त्वाच्या आणि नाजूक विषयांवर मत मांडण्याचे काम प्रवक्ते करतात. विविध प्रसारमाध्यमे, दूरचित्रवाणी आदी माध्यमांतून आयोजित केल्या जाणाऱ्या चर्चा आदिंमध्ये प्रवक्ते सहभागी होत असतात. आजाल सोशल मीडियासारखे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तसेच, संदेशवहनही गतीमान झाले आहे. त्यामुळे बदलत्या कालासोबत सोशल मीडिया आणि एखाद्या विषयावर तातीडने प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे ठरते. अशा वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवक्ते पक्षाची भूमिका व्यक्त करतात.