BMC: मुंबईत उद्यापासून दारूचे दुकान बंद; केवळ किराणा दुकाने, मेडिकल यांसारख्या जीवनाश्यक वस्तूंचे दुकाने राहणार सुरु

महाराष्ट्रात (Maharashtra) कालपासून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यादरम्यान, अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. यामुळे तळीरामांनी दारुच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. यामुळे मुंबईत उद्यापासून दारू विक्रिला बंदी घातली आहे. तसेच किराणा दुकाने, मेडिकल यांसारख्या जीवनाश्यक वस्तूंचे दुकान उघडण्यास मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) परवानगी दिली आहे. राज्यात काही भागात नागरिकांना राज्य सरकारच्या आदेशांचे उल्लघंन केल्याचे समोर आले आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाने 4 मे पासून लॉकडाऊन कालावधी शिथील करण्यासंदर्भात काही भागात इतर सेवांना परवानगी दिली होती. मात्र, काही भागात नागरिक शिस्त पाळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच इतक्या दिवसांपासून घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. यामुळे मुंबईत उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंठ ठेवण्यात येणार आहे, असा आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली आहे. या आदेशाचे प्रत्येकाने पालन करावे, असेही आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. हे देखील वाचा- पुणे: राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन; सामाजिक अंतर आणि सॅनिटाइजरचा वापर न केल्याप्रकरणी दारुच्या 9 दुकानांवर कारवाई

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूने संपूर्ण भारतातच हाहाकार माजवला आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 15 हजार 525 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.