Suraj Chavan With Aaditya Thackeray | X @Suraj Chavan

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकवर्तीय आणि युवासेनेचे नेते सूरज चव्हाण (Suraj Chavan)  ला जामीन मंजूर झाला आहे. आता सुमारे वर्षभरानंतर सूरज चव्हाण तुरूंगातून बाहेर पडणार आहे. खिचडी घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण आरोपी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 1 लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला आहे. कोरोना संकट काळामध्ये लॉकडाऊन असताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खिचडीचं कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी सूरज चव्हाण 17 जानेवारी 2024 पासून तुरुंगामध्ये होता.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सूरज चव्हाणची चौकशी केली होती. त्यानंतर ईडी कडून सूरज चव्हाणला अटक करण्यात आली.या प्रकरणी अमोल कीर्तीकर यांचीही चौकशी झाली होती.

कथित खिचडी घोटाळा काय आहे?

कोरोना संकट काळात लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेले अनेक जण उघड्यावर पडले होते. तेव्हा त्यांना अन्न देण्यासाठी बीएमसीने 52 कंपन्यांना खिचडी वाटपाचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली होती. या कामात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट दिल्याचा तसेच करारासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा, ज्या कंपनीला कंत्राट दिले त्या कंपनीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकल्याची माहिती कंपनीने लपविली असे आरोप आहेत. तर एकूण 100 कोटी रूपयांचा गैरव्यवहार आणि 38 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditya Thackeray (@adityathackeray)

सूरज चव्हाण हे युवासेनेचा साधारण कार्यकर्ता नंतर आदित्य ठाकरेंचा विश्वासू आणि पुढे ठाकरे गटाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत होते.