Coronavirus | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

विनामास्क (Face Mask) वावरणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या मुंबई माहापालिका कर्मचारी (BMC), अधिकाऱ्यांवर गर्दुल्यांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना दादर रेल्वे स्टेशन परिसरातील एका भागात घडल्याचे समजते. कोरोना व्हायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरण्याचे अवाहन महाराष्ट्र सरकारने नागरिकांना केले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही राज्य सरकारने प्रशासन, पोलिसांना दिले आहेत.

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. त्यानुसार अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे काही अधिकारी दादर रेल्वे स्टेशन परिसरात गेले होते. या ठिकाणी काही लोक विनामास्क फिरत होते. या वेळी पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले असता ते लोक आक्रमक झाले. त्यातील एकाने पालिका कर्मचारी आणि महिला अधिकाऱ्यावर कोयता उगारला आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आजुबाजूच्या लोकांनी त्याला आवरले आणि पुढील अनर्थ टळला.

विनामास्क फिरणारे हे लोक गर्दुले होते. ते नेहमीच विनामास्क फिरतात. पालिका अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी हल्का करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच, या व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार देणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Face Mask Fine in Maharashtra: विनामास्क प्रवास केल्यास भरावा लागणार 200 रुपये दंड, रेल्वे पोलिसांना अधिकार)

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने रेल्वे पोलिसांना (GRP) नुकतेच निर्देश दिले आहेत की, विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड (Fine) वसूल करण्यात यावेत. त्यामुळे चेहऱ्यावर मास्क (Face Mask असणे आवश्यक आहे. हा दंड मुंबई लोकल (Mumbai Loca) प्रवासादरम्यान आकारण्यात येणार आहे. आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरस संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारने हे निर्देश दिले आहेत.